जिवंत दफन होऊ लागलेत लोक
47 लाखांमध्ये कंपनीकडून अजब थेरपी
एंक्झाइटी किंवा घबराट होणे नवे नाही. कुठल्याही गोष्टीची भीती वरचढ ठरल्यास सदैव भीती सतावत राहते. या भीतीने दीर्घकाळापर्यंत साथ न सोडल्यास मोठी समस्या उभी राहू शकते. लोक यापासून वाचण्यासाठी अनेक प्रकारच्या थेरपी आणि औषधांचा वापर करतात. परंतु एका कंपनीने घबराटीचा असा उपचार शोधून काढला आहे की तुम्हाला धक्काच बसेल. घबराटीमुळे अधिक त्रस् असलेल्या लोकांना कंपनीने एका थेरपी अंतर्गत जमिनीत जिवंत गाडण्याची तयारी चालविली आहे.
जर तुम्ही एंक्झाइटी किंवा भय यासारख्या समस्येला तोंड देत असाल तर जिवंत दफन होण्यासाठी तयार रहा. एक कंपनी थेरपीच्या नावावर 47 लाख रुपयांमध्ये असे पॅकेज घेऊन आली आहे, ज्यात 60 मिनिटांपर्यंत जिवंत दफन होत घबराटीपासून मुक्तता मिळवता येते. भीती घालविण्यासाठी जीवनाची जोखीम घेण्यासाठी तुम्ही तयार आहात का हा खरा प्रश्न आहे.
जिवंत दफन करून दूर करणार भीती
प्रिकेटेड अकॅडमी नावाच्या कंपनीने ही अजब थेरपी विकसित केली आहे. यात एंक्झाइटी आणि भयाने ग्रस्त लोकांना जिवंत दफन करून त्यांच्यावर उपचार करण्याचा दावा करण्यात येत आहे. या थेरपीला ‘स्ट्रेस थेरपी’ नाव देण्यात आले आहे. याच्या अंतर्गत रुग्णाला 40-60 मिनिटांपर्यंत कब्रमध्ये रहावे लागणार आहे. या अनोख्या थेरपीचे ऑनलाइन व्हर्जनही उपलब्ध होणार असून याकरता 12 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. हे पॅकेज लोकांना भय आणि एंक्झाइटीपासून मुक्तता मिळविण्यास मोठी मदत करू शकते असा दावा कंपनीने केला आहे.
स्ट्रेस थेरपी
ही स्ट्रेस थेरपी पूर्णपणे सुरक्षित आहे. जिवंत दफन केल्यावरही माणसाच्या जीवाला कुठलाच धोका नसणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या थेरपीबद्दल अनेक लोकांनी कंपनीशी संपर्क साधला आहे. परंतु ही थेरपी प्रत्येकासाठी नसणार आहे. अनेक पर्यायांपैकी एक पर्याय निवडण्याची संधी देण्यात येणार आहे. कब्रमध्ये दफन करण्यात आलेल्या रुग्णाच्या सुविधेची पूर्ण काळजी घेतली जाणार आहे. त्याला संगीत ऐकण्यास मिळणार आहे. तसेच प्रकाशासाठी मेणबत्त्या देण्यात येतील. ही अजब थेरपी रशियात सुरू करण्यात आली आहे. ही थेरपी लोकांना स्वतःशी लढण्याकरता प्रेरित करेल आणि जीवनात आनंदी होण्यासाठी एक कारण देणार असल्याचा कंपनीचा युक्तिवाद आहे.