कणकवली / प्रतिनिधी-
लाईट लावण्यासाठी पिन लावताना शॉक लागून साळिस्ते – कांजीरवाडी येथील शैलेश लक्ष्मण कांजीर (24) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना साळीस्ते येथेच रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. शाॅक लागल्यानंतर शैलेश याला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तो मयत असल्याचे सांगितले. याप्रकरणी कणकवली पोलिसांत आकस्मिक मृत्यू दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.