आष्टा प्रतिनिधी
आष्टा येथील भाजी मंडई नजीक असलेल्या हॉटेल सनशाईन मध्ये एका युवकाचा धारदार शस्त्राने निर्घुण खुन करण्यात आला. वैभव बाळू घस्ते (वय 19) असे त्याचे नाव आहे. तो आष्टा येथील साठेनगर येथे राहतो. या घटनेने आष्टा शहरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास आष्टा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भाजी मंडई नजीक हॉटेल सनशाईन परा†मट रूम व बिअर बार आहे. या हॉटेल मध्ये वैभव घस्ते गेला होता. संशयित अंकित राठोड याने वैभव घस्ते याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केला. त्याला तातडीने आष्टा येथील ग्रामीण ऊग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आष्टा ग्रामीण रुग्णालयासह हॉटेल परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड, हवालदार प्रवीण ठेपणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशा†यत आरोपी अंकित राठोड हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. त्याचा आष्टा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेने आष्टा शहरात खळबळ उडाली आहे.