प्रतिनिधी /बेळगाव
मोटारसायकली चोरल्याच्या आरोपावरून उद्यमबाग पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याजवळून तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी ही माहिती दिली आहे.
विशाल महादेव मक्कळगेरी (वय 24, रा. राजारामनगर, उद्यमबाग) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. उद्यमबागचे पोलीस निरीक्षक रामण्णा बिरादार व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. केए 22 ईव्ही 8863 क्रमांकाची हिरो स्प्लेंडर प्लस, नंबरप्लेट नसलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस, केए 31 के 7871 क्रमांकाची बजाज मोटारसायकल अशा तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या
आहेत.