सिंधुदुर्ग : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कोकणातील सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक हे अँटी करप्शन ब्युरोच्या रडावर आले आहेत. आमदार नाईक यांना पुन्हा एकदा अँटी करप्शन ब्युरोकडून नोटीस मिळाली आहे. सोमवारी 5 डिसेंबरला रत्नागिरीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात ते हजर राहिले. वैभव नाईक यांना या नोटिसीमध्ये मालमत्तेसंदर्भात उल्लेख केला आहे, त्यानुसार त्यांच्यासह पत्नी आणि त्यांच्या भावाची रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केली.
चौकशीसाठी एसीबीच्या कार्यालयाच आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “चौकशी झाली याचं वाईट वाटत नाही तर चौकशी अन्यायी पद्धतीने झाली याचे वाईट वाटत आहे. ही चौकशी राजकिय उद्देशाने प्रेरित असून जे आमदार ठाकरे गटाशी एकनिष्ट राहीले त्यांच्याविरोधात चौकशी केली जात आहे.”
Previous Articleअभिनेता विशालने मीरासोबतचा फोटो केला शेअर, पोस्ट व्हायरल
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.
Related Posts
Add A Comment