सरकारी कर्मचाऱयाला थप्पड लगावल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ रोहतक
हरियाणातील आम आदमी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष नवीन जयहिंद यांना रोहतक पोलिसांनी अटक केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (पीजीआय) डेप्युटी रजिस्ट्रारला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पीजीआयमध्ये बुधवारी नर्सिंग कौन्सिलिंगदरम्यान मोठा गोंधळ झाला होता, नवीन जयहिंद आणि ईश्वर शर्मा यांनी शासकीय कर्मचाऱयांना मारहाण केल्याचा आरोप झाला होता.
नर्सिंग भरतीदरम्यान कागदपत्रे पडताळणीसाठी चंदीगडमधून काही कर्मचारी रोहतक येथील पीजीआयमध्ये पोहोचले होते. यादरम्यान अर्जदारांच्या तक्रारींवर नवीन जयहिंद तेथे पोहोचले. तेथील अधिकाऱयांशी चर्चा करताना जयहिंद यांची कर्मचाऱयांसोबत बाचाबाची झाली. यावेळी नवीन जयहिंद यांनी कर्मचाऱयाला मारहाण केल्याचा आरोप आहे.