आचरा / प्रतिनिधी
Acharya’s Sukanya stings in IPL!
महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई कडून अष्टपैलू खेळाचे दर्शन
सोशल मिडीयावर हुमेरा ठरलिय कौतुकाचा विषय
आचऱ्याची सुकन्या हुमेरा काझी हिने महिला प्रीमियर लीग मध्ये मुंबई इंडियन्स कडून खेळताना आपल्या दर्जेदार खेळातून मुंबई इंडियन्स ला विजेते पद मिळवून देण्यासाठी मोलाचं सहकार्य करुन आचरे गावचे नाव रोशन केले आहे. तीच्या अभिनंदनाचे पोष्ट सोशल मिडीया वर व्हायरल झाले आणि आचरे काझी वाडीच्या हुमेरा काझी चे सर्वत्र कौतुक होत आहे.हुमेराला गावचीओढ पहिल्या पासूनच होती.तीसरीमध्ये असल्यापासूनच तीला क्रिकेट खेळाची आवड निर्माण झाली होती.गावी आल्यावर मोठ्या टिमबरोबर खेळूनही जिंकत होती.ऑल राउंडर म्हणून तीने आपली ओळख निर्माण केली होती.
या बाबत तिच्याशी फोनवरुन संपर्क साधल्यावर तिने आपल्या क्रिकेट कारकिर्दि विषयी माहिती दिली. मुंबई संघातून १६वर्षाखालील संघातून आपल्या करिअरची सुरुवात झाल्याचे सांगत .१९वर्षाखालील संघात सुरुवातीला तीला सोळावा खेळाडू म्हणून निवड झाली होती.खचून न जाताही संघात संधी मिळताच आपल्या खेळातून संघात स्थान निर्माण केले.त्यानंतर२३वर्षाखालील संघातून खेळत तीने सिनियर संघात स्थान निर्माण केले.महिला भारतीय संघात, दोनवेळा चॅलेंजर मधून खेळल्याचे तिने सांगितलं.तीच्या खेळाने प्रभावित होत मुंबई इंडियन्स च्या संघमालक नीता अंबानी यांनी तिला मुंबई इंडियन्स मध्ये संधी दिली.संधीचा फायदा उठवित फायनल मध्ये ऍस्मेसला रनाऊट केले होते.आचरेगावच्या सुकन्येची क्रिकेट मधील एन्ट्री आचरवासीयांसाठी अभिमानास्पद ठरत असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.