प्रयोगशाळेच्या साहित्यासाठी केली 10 हजार रुपयांची रक्कम सुपूर्द
आचरा प्रतिनिधी
आचरा पिरावाडी येथील श्री रामेश्वर विद्यामंदिर हायस्कुलच्या विद्यार्थ्यांसाठी लागणारे प्रयोग शाळेतील साहित्य खरेदी करण्यासाठी आचरा पिरावाडी येथील उद्योजक माजी ग्रामपंचायत सदस्य मुज्जफर मुजावर यांनी 10 हजार रुपयांची मदत केली. ही मदत त्यांनी शाळा समिती अध्यक्ष डॉ प्रमोद कोळंबकर व मुख्याध्यापक रणजित बुगडे यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी अब्दुल मुजावर, पोलीस पाटिल विठ्ठल धुरी, राजू मुजावर, बंड्या पराडकर, दर्शन तारी, नित्यानंद तळवडकर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुज्जफर मुजावर म्हणाले की माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सुविधा वेळोवेळी मिळाव्यात कोणताही विद्यार्थी कोणत्याही कारणाने शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो म्हणूनच माझ्या शाळेला ही भेट सुपूर्द केली आहे. यावेळी शाळा समिती अध्यक्ष डॉ प्रमोद कोळंबकर व हायस्कुलचे मुक्याध्यापक रणजित बुगडे यांनी वेळोवेळी हायस्कुलला मदतीचा हात देणाऱ्या मुज्जफर मुजावर यांचे आभार मानले.