प्रतिनिधी/ म्हापसा
कळंगूट परिसरातील पर्यटकांना विविध आमिषे दाखवून त्यांना लुटणाऱ्या 21 दलालांवर कारवाई करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 जून रोजी मध्यरात्रीनंतर ही कारवाई करण्यात आली. पर्यटन व्यापार अधिनियम 1182 कलमांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक परेश नाईक यांनी दिली.
आठवडाभरापूर्वी सुमारे 34 दलालांवर कारवाईत करण्यात आली होती. त्यानंतर दलालांवर कारवाईची मोहीम सुरूच ठेवण्याचा इशारा निरीक्षक नाईक यांनी दिला होता. त्यानुसात एका आठवड्यात 55 दलालांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दलाल अधिकतर बाहेरील राज्यातील आहेत, असे पोलीस निरीक्षक म्हणाले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनावर ही कारवाई