बेळगाव उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आसिफ (राजू) सेठ यांच्या प्रचारदौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रविवारी सायंकाळी उत्तर मतदारसंघाचे उमेदवार आसिफ (राजू) सेठ यांनी कार्यकर्त्यांची सिव्हिल हॉस्पिटल रोड येथील पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.कार्यकर्त्यांने दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. आज पर्यंत आपण पक्षाच्या विकासासाठी योगदान दिले असून यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसला सत्तारूढ करण्यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी आमदार फिरोझ सेठ यांनी पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांसाठी ठरवून दिलेल्या उद्दिष्टांवर चर्चा केली. आगामी निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले आपण नेहमीच प्रामाणिकपणे काम केले आहे आणि भविष्यातही निवडणुकीच्या निकालाची पर्वा न करता जनसेवेत तत्पर राहू. आगामी निवडणुकीत पक्ष आणि उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.