63 टक्के हिस्सा विकणार ः 3 हजार 700 कोटींची प्राप्ती होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कर्जाची परतफेड करण्याच्या कारणास्तव अदानी समूह आगामी काळामध्ये आपला अम्बुजा सिमेंटमधील वाटा विक्री करू शकते, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. अलीकडच्या काळात या कंपनीच्या कामगिरीकडे साऱयांचेच लक्ष लागून राहिले असून गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी कंपनीने कर्ज फेडण्याच्या प्रक्रियेला वेग दिल्याचे दिसून आले आहे.
आगामी काळात कर्ज फेडण्यासाठी अदानी समूह 4.5 टक्के इतकी अम्बुजामधील हिस्सेदारी विकणार असल्याचे सांगितले जात आहे. या विक्रीतून कंपनीला 3 हजार 700 कोटी रुपये प्राप्त होतील, असेही समजते.
अधिग्रहणाची प्रक्रिया
अम्बुजा सिमेंटमध्ये अदानी समूहाचा जवळपास 63 टक्के इतका वाटा आहे. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये अम्बुजा सिमेंट आणि एसीसी यांची संपूर्ण हिस्सेदारी अदानी समूहाने आपल्या ताब्यात घेतली. हा व्यवहार अदानी समूहाने 10.5 अब्ज डॉलर इतक्मया रकमेत केला होता. अदानी समूह या हिस्सेदारी विक्रीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांचा भरवसा जिंकण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. आपल्या डोक्मयावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी समूहाचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
अहवाल आणि नंतरची वाटचाल
24 जानेवारीला अमेरिकेतील शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या समभागांमध्ये मोठी घसरण अनुभवायला मिळाली. याचा फटका अदानी समूहाला बसला होता. अलीकडेच अदानी समूहाने 7 हजार 374 कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे. या पाठोपाठच आता वरीलप्रमाणे रक्कम उभी करून कर्ज फेडले जाणार आहे. शुक्रवारी शेअरबाजारात समुहाचे 10 पैकी 5 समभाग घसरणीसह बंद झाले होते.