जगासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ असलेला युगपुरूष माझा ‘आज्या’ आहे; आदित्य ठाकरेंची पोस्ट
आजोबा आणि नातू हे नातं जगात सगळ्यात ‘स्पेशल’ असतं. जगासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ असलेला युगपुरूष माझा ‘आज्या’ आहे… अशी खास पोस्ट शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झालेत. अभिवादनासाठी सकाळपासूनच शिवाजी पार्कवर रांगा लागल्या आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अभिवादन केलंय. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी खास पोस्ट करून बाळासाहेबांविषयीच्या आठवणी जागवल्या आहेत.
आदित्य ठाकरेंची खास पोस्ट!
आजोबा आणि नातू हे नातं जगात सगळ्यात ‘स्पेशल’ असतं… त्यात आदर असतोच, पण मैत्री जास्त असते… धाक असतोच, पण प्रेम जास्त असतं… वयाचं अंतर असतंच, पण मन जवळ असतं…. आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो… त्यापेक्षा घट्ट मित्र दुसरा कोणीही असू शकत नाही! मी भाग्यवान आहे की, जगासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ असलेला युगपुरूष माझा ‘आज्या’ आहे… बाळासाहेबांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन, अशी खास पोस्ट आदित्य ठाकरेंनी लिहिली आहे.मी भाग्यवान आहे की, जगासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ असलेला युगपुरूष माझा ‘आज्या’ आहे …
बाळासाहेबांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!