आदित्य ठाकरे आज सावंतवाडीत
सावंतवाडी : प्रतिनिधी
सालईवाड्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दर्शन घेतले. लोकमान्य टिळक यांच्यापासून प्रेरणा घेऊन या सार्वजनिक गणेशोत्सव उत्सवाला सुरुवात झाली. यंदा गणेशोत्सवाचे 118 वे वर्ष आहे. यासंदर्भात मंडळाचे राजा स्वार यांनी आदित्य ठाकरे यांना माहिती दिली. आदित्य ठाकरे यांनी या मंडळाच्या गणेशोत्सवाचा इतिहास प्रेरणादायी आहे.एवढी वर्ष सातत्याने गणेशोत्सव साजरा होत आहे. ही बाब कौतुकास्पद असल्याचे ठाकरे म्हणाले.यावेळी अभय नेवगी, अमरनाथ सावंत, बाळ नार्वेकर राजू भाट, आबा पडते संकेत नेवगी, ज्ञानु मिशाळ प्रशांत नार्वेकर मंगेश नानचे, वैष्णवी बांदेकर सायली बांदेकर आदी उपस्थित होते.