राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) बेकायदेशीर ठरवलेल्या मुंबईतील मध- मार्वे भागातील सिनेस्टुडिओवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC ) हातोडा उगारला आहे. या स्टुडिओने महापालिकेच्या परवानग्यांचा गैरवापर करून तात्पुरत्ये बांधकाम करणयाऐवजी कायमस्वरूपी बांधकाम केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणात भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Sommaya) यांनी बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल (BMC commisioner Iqbal Sing Chahal) यांच्यावर सातत्याने टीका केली होती. किरिट सोमय्या यांनी हि सर्व बांधकामे बेकायदेशीर आहेत हे माहित असूनही ईक्बाल चहल यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप केला होता. तसेच महाविकास आघाडी (MVA) सरकारने तात्पुरत्या बांधकामांच्या नावाखाली असल्या बेकायदेशीर बांधकामांना परवानगी दिल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने केला.
हरिद लवादाने आपल्या आद्यादेशात म्हटले आहे की, “या स्टुडियोजना केवळ तात्पुरती रचना उभारण्यासाठीच परवानगी दिली होती. परंतु चित्रपट स्टुडिओने प्रचंड संरचना उभारल्या आहेत ज्यामध्ये भरपूर स्टील आणि काँक्रीट साहित्य वापरले होते.”
“स्टुडिओजने या संरचना पर्यावरणास अनुकूल साहित्य वापरून तयार केल्या असल्याने त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचे मानले पाहिजे. असा युक्तीवाद केला आहे ज्याच्याशी आम्ही सहमत नाही” असेही लवादाने पुढे म्हटले आहे.