महादेवराव महाडिक यांच्या विजयानंतर महाडिक गटाचे आणखी दोन उमेदवार विजयी झाले आहेत. महाडिक गटाचे उत्पादक गट क्रं 1 मधून विजय भोसले, संजय मगदूम हे विजयी झाले असून दुसऱ्या फेरीतील पहिल्या गटात देखील महाडिक गटाने बाजी मारली आहे. या गटात जवळपास 1357 मताधिक्याने विजयी झाले आहेत. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार महाडिक गटाचे 21 पैकी 3 उमेदवार विजयी झाले आहेत.
दुसऱ्या फेरीतील उत्पादन गट क्रमांक 1 मधील महाडिक पॅनेलचे सर्व उमेदवार वाढून असून जवळपास 400 ते 500 मतांनी महाडिक गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत.
पहिल्या फेरीत महाडिक गटाचे सर्व उमेदवार जवळपास 800 ते 900 मतांनी आघाडीवर होते. कारखाना परिक्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या गावांमध्येही महाडिक गट आघाडीवर असल्याची परिस्थिती आहे.
उत्पादक गट क्रमांक- 6 मधून आलेला अपडेट पुढीलप्रमाणे,
सत्ताधारी महाडिक गटाचे गोविंद दादू चौगले यांना 3240 तर विश्वास सदाशिव बिडकर यांना 3161 मते पडली आहेत. तर विरोधी सतेज पाटील गटाचे दगडू मारुती चौगले 2413 आणि शांताराम पांडुरंग पाटील यांना 2397 मते पडली आहेत.
महिला गटीतील लढतीमध्ये सत्ताधारी महाडिक गटाच्या वैष्णवी राजेश नाईकव यांना 3195 तर कल्पना भगवानराव पाटील =3255 विरोधी सतेज पाटील गटा पुतळाबाई मारुती मगदूम यांना 2339 आणि निर्मला जयवंत पाटील यांना 2489 मते मिळाली आहेत.
अनुसूचित जाती आणि जमाती गटामध्ये सत्ताधारी महाडिक गटाच्या नंदकुमार बाबुराव भोपळे यांना 3118 मते पडली असून विरोधी सतेज पाटील गटाच्या बाबासो थळोजी देशमुख यांना 2266 इतके मते मिळाली आहेत.
इतर मागासवर्गीय गटामध्ये सत्ताधारी महाडिक गटाच्य़ा संतोष बाबुराव पाटील यांना एकूण 3166 मते मिळाली असून विरोधी सतेज पाटील गटाच्या मानसिंग दत्तू खोत यांना 2410 मते मिळाली आहेत.