दृश्यम 2 ला मिळालेल्या यशानंतर अजय देवगण पुन्हा एकदा सुपर
नॅचरल थ्रिलर चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आर. माधवन आणि दक्षिणेतील दिग्गज अभिनेत्री ज्योतिका मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची घोषणा अजय देवगणने सोशल मीडियावर केली आहे. काही गोष्टी अलौकिक वळण घेणार आहेत. विकास बहल यांच्या दिग्दर्शनात तयार होणाऱ्या एका थ्रिलरपटात आर. माधवन आणि ज्योतिका यांच्यासोबत मी काम करणार आहे. 8 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे अजयने स्वत:च्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. अजय देवगण लवकरच दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम 3’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी त्याचा दृश्यम 2 हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. परंतु यंदा प्रदर्शित झालेला त्याचा ‘भोला’ हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नव्हता.