चेन्नई / वृत्तसंस्था
कसोटी संघातून बाहेर फेकला गेलेला अनुभवी अजिंक्य रहाणे व युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल यांनी आक्रमक द्विशतके झळकावल्यानंतर पश्चिम विभागाने उत्तर-पूर्व विभागाविरुद्ध दुलीप चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत 2 बाद 590 धावांचा डोंगर रचला. रहाणेने नाबाद 207 तर जैस्वालने 228 धावांचे योगदान दिले. या दोघांनी दुसऱया गडय़ासाठी 333 धावांची भागीदारी साकारली. या लढतीत पृथ्वी शॉने देखील 113 धावांची शानदार खेळी साकारली आहे. त्याने जैस्वालसमवेत 206 धावांची सलामी दिली होती.