- प्रतिनिधी,विटा
उपमुख्यमंत्री अजित पवार हे जसे बेधडक या बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत तसेच त्यांच्या कामाच्या झपाट्यासाठी सुद्धा ओळखले जातात. याचा प्रत्यय खानापूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना आला. विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी अजित पवारांना खानापूर मतदार संघातील टंचाई परिस्थितीबाबत 20 सप्टेंबरला पत्र दिले होते. त्यानंतर अवघ्या ४८ तासात प्रशासनाकडून मतदारसंघातील ३६ गावांमध्ये टंचाई घोषीत करण्यात आल्याचे पत्र प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी वैभव पाटील यांना पाठवले आहे.
विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी दुष्काळी परिस्थिती बाबत माहिती देताना उपाययोजना करण्याबाबत निवेदन दिले होते. दुष्काळी खानापूर मतदारसंघात लक्ष्य घालण्याबाबत मागणी केली होती. अजितदादा गटात प्रवेश केल्यानंतर पहिलेच काम घेऊन गेलेल्या टीम वैभव पाटील यांना अजितदादांच्या कामाचा झपाटा दिसून आला. मुंबईहून वैभव पाटील टीम परततेय तोवर त्यांच्या हातात प्रशासनाचे निवेदनाला उत्तर देणारे पत्र पडले.
प्रशासनाने चारा टंचाईच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असल्याचे सांगत सव्वा लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे आणखी चाऱ्याची गरज पडल्यास आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे म्हटले आहे.वैभव पाटील भेटल्याच्या 48 तासात अजित दादांनी तातडीने केलेल्या कार्यवाहीमुळे खानापूराकडे लक्ष देण्याचा विषय उपमुख्यमंत्री अजित दादांनी गांभीर्याने घेतला की काय अशी चर्चा सुरू झाली आहे
याबाबत प्रांताधिकारी बांदल यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, तहसिलदार आटपाडी व तहसिलदार खानापूर यांचेकडून टंचाई घोषीत करण्या बाबत अनुक्रमे 14 व 25 गावांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते सदर सर्व गावामध्ये टंचाई घोषीत करण्यात आली आहे. तसेच पाणी टंचाईच्या अनुषंगाने तहसिलदार आटपाडी यांचे मागणी नुसार आटपाडी तालक्यामध्ये एकुण 6 गावामध्ये 8 टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आलेला आहे सध्यस्थितीत एकही पाणी टँकर मागणीचा प्रस्ताव प्रलंबित नाही.
चारा टंचाईच्या अनुषंगाने तालुका कृषी अधिकारी खानापूर व आटपाडी यांचा मागणविण्यात आला होता. सदर अहवालाचे अवलोकन करता खानापूर तालुक्यात अहवाल 1 लाख 19 हजार 761 टन तसेच आटपाडी तालुक्यात 13 हजार 995 टन चारा उपलब्ध आहे.