वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा माजी सलामीचा 45 वर्षीय आकाश चोप्राला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे आता सुरू असलेल्या 16 व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेलाही या घटनेने बराच धक्का बसला आहे.
45 वर्षीय आकाश चोप्रा सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत क्रिकेट समालोचक म्हणून कार्यरत आहेत. आकाश चोप्राला सर्दी, खोकला सुरू झाल्याने त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. चोप्रा संदर्भात विशेष काळजी करण्याची गरज नसून तो काही दिवसातच पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल. अलीकडच्या कालावधीत भारतामध्ये 3038 कोरोनाग्रस्त नवे रुग्ण मिळाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी अधिकृत जाहीर करण्यात आले.