मुंबई
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेसचा आयपीओ सादरीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. सदरच्या प्रस्तावाला एज्युटेक कंपनी बायजूच्या मंडळाने सोमवारी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत मंजुरी दिली आहे. परिणामी आकाशचा आयपीओ आता शेअरबाजारात दाखल करणे कंपनीला शक्य होणार आहे. सदरचा आयपीओ 2024 च्या मध्यावर सादर करण्याचे प्रयोजन असल्याचे समजते. याआधी 2023 मध्ये आयपीओ सादरीकरणाची योजना होती. आयपीओतून 1 अब्ज डॉलर्स किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम उभारणी करण्याचा इरादा आहे.