महत्त्वाची भूमिका
वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारून चाहत्यांमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. अक्षय आता लवकरच ‘द ब्रोकन न्यूज’च्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसून येणार आहे. या सीरिजमध्ये तो श्रिया पिळगावकरसोबत झळकणार आहे. श्रियाने पहिल्या सीझनमध्येही महत्त्वाची भूमिका साकारली होती. मागील सीझनमध्ये सोनाली बेंद्रे आणि जयदीप अहलावत यासारखे दिग्गज कलाकार दिसून आले होते.
ओटीटी प्लॅटफॉर्म झी5 च्या या सीरिजचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. या सीरिजमध्ये अक्षय, श्रियासोबत सोनाली बेंद्रे आणि जयदीप अहलावत देखील महत्त्वाच्या भूमिकेत असतील. अक्षय याचबरोबर दीपिका पदूकोन, ऋतिक रोशन, अनिल कपूर आणि करण सिंह ग्रोवर यांच्या ‘फायटर’ या चित्रपटात दिसून येणार आहे.
‘फायटर’ चित्रपटात अक्षय वायुदल वैमानिकाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणर आहे. अक्षय यापूर्वी ‘अमेरिकन चाय’, ‘पिझ्झा’, ‘इसी लाइफ में’, ‘फितूर’, ‘पीकू’, ‘जंगली’ यासारख्या चित्रपटांमध्ये दिसून आला आहे.