वृत्तसंस्था / माद्रिद (स्पेन)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या माद्रिद खुल्या मास्टर्स पुरूषांच्या टेनिस स्पर्धेत शुक्रवारी स्पेनच्या नवोदित टेनिसपटू कार्लोस अलकॅरेझने आपल्याच देशाच्या अनुभवी आणि टॉप सीडेड राफेल नदालला पराभवाचा धक्का देत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. आता अलकॅरेझ आणि सर्बियाचा जोकोव्हिच यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल.
पुरूष एकेरीच्या शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अलकॅरेझने नदालचा 6-2, 1-6, 6-3 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. हा सामना अडीच तास चालला होता. अलकॅरेझने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत एटीपी टूरवरील मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धेत तिसऱयांदा उपांत्य फेरी गाठली आहे. दुसऱया एका सामन्यात सर्बियाच्या माजी टॉप सीडेड जोकेव्हिचने पोलंडचा हुबर्ट हुरकेझचा 6-3, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. जोकोव्हिचने या स्पर्धेत सातव्यांदा उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. शुक्रवारचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना जोकोव्हिचने 78 मिनिटात जिंकला.