महिलांचा अपमान प्रकृतीसाठी हानिकारक आहे
बॉलिवूड स्टार आलिया भट्टचा चित्रपट ‘डार्लिंग्स’ मागील काही काळापासून चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात आलिया भट्टसोबत तिच्या आईच्या भूमिकेत शेफाली शाह दिसून येणार आहे. या दोघींसोबत विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू देखील मुख्य भूमिकेत आहे.
बदरू (आलिया भट्ट) स्वतःच्या आईसोबत (शेफाली शाह) पोलीस स्थानकात पती हमजाच्या (विजय वर्मा) बेपत्ता होण्याविषयी तक्रार नोंदविताना ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. हमजा कशाप्रकारे स्वतःच्या पत्नीला मारहाण करत असतो हे चित्रपटात दर्शविण्यात आले आहे.
डार्लिंग्स चित्रपटाचे दिग्दर्शन जसमीत रीन याने केले आहे. हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. या डार्क कॉमेडी ड्रामा चित्रपटाची निर्मिती शाहरुख खान-गौरी खानची कंपनी रेड चिलीज आणि आलिया भट्टने केली आहे. हा चित्रपट 5 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित केला जाणार आहे.
आलिया ‘डार्लिंग्स’सोबत रणवीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’मध्येही दिसून येणार आहे. तसेच करण जौहरच्या दिग्दर्शनात तयार होणारा चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर सिंहसोबत ती काम करत आहे. आलियाने याचबरोबर फरहान अख्तर याच्या दिग्दर्शनात तयार होणारा चित्रपट ‘जी ले जरा’ स्वीकारला असून यात ती प्रियांका चोप्रा तसेच कॅटरीना कैफ यांच्यासह मुख्य भूमिकेत असणार आहे.