फर्रे चित्रपटातून झळकणार सलमानची भाची
सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्री लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमाननेच सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली आहे. अलिजेह ही फर्रे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. सलमान खानने या चित्रपटाबद्दल स्वत:च्या पोस्टमध्ये काही प्रमाणात माहिती देखील दिली आहे. सलमानने या चित्रपटाचा टीझर देखील शेअर केला आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन सौमेंद्र पाधी करणार आहेत. चित्रपटाच्या टीझरमध्ये अलिजेह ऑस्ट्रेलियातील एका शाळेत शिक्षण घेताना दिसून येत आहे. तसेच साहिल मेहता, जेन शॉ, प्रसन्ना बिष्ट हे कलाकार देखील यात दिसून येत आहेत.
चित्रपटात रोनित रॉय आणि जूही बब्बर सोनी हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट थ्रिलर ड्रामा धाटणीचा असून तो 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होईल. अलिजेह ही सलमानची बहिण अलवीरा खान आणि निर्माते अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. यामुळे अलिजेहच्या बॉलिवूड पदार्पणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.