प्रतिनिधी/बांदा-
सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले गावातील सर्व शिवसैनिक आणि पदाधिकारी यांची आज बैठक झाली. आज महाराष्ट्रात ज्या घडामोडी होत आहेत त्यानुसार शाखाप्रमुख राजू केरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या आजच्या बैठकीत सर्वांनी एक मुखाने निर्णय घेण्यात आला की सर्व जण मूळ शिवसेना म्हणजे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबानं सोबतच राहणार आहेत. पक्ष आणखी मजबूत केला जाणार आहे. सदर बैठकीस माजी युवा सेना उपतालुखाप्रमुख विक्रांत नेवगी,उपशाखाप्रमुख बाळा शेर्लेकर, शाखाप्रमुख आना धुरी, रुपेश आमडोसकर,गौरेश केरकर, तातो आरोस्कर, बबलू तेली, अमोल धुरी साईनाथ धुरी. बाळा आरोस्कर उपस्थित होते.