सार्वजनिक रस्त्यावर कंपनीची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनच्या झूक्स यांच्याकडून सार्वजनिक रस्त्यावर सेल्फ ड्रायव्हिंग कार ‘रोबोटॅक्सी’ चालवली जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावेळी कंपनीने एका निवेदनात, सांगितले की गेल्या आठवड्यात त्यांनी एक इलेक्ट्रिक वाहन लॉन्च केले आहे. ज्यामध्ये स्टीयरिंगच नसणार असल्याची माहिती आहे.
फोस्टर सिटी, पॅलिफोर्निया येथे सादरीकरणावेळी झूक्सने आपल्या कर्मचाऱ्यांना एका कंपनीच्या ऑफिसमधून दुसऱ्या ऑफिसपर्यंत सेल्फ ड्रायव्हिंग कारने नेले आहे. यावेळी ड्रायव्हरलेस पॅसेंजर कार सार्वजनिक रस्त्यावर 1 किमीपेक्षा जास्त चालवण्यात आली. ही चाचणी शटल सेवेचा एक भाग होती. यात नंतर आवश्यक ते बदल करण्यासाठी कंपनीला संधी असणार आहे.
सिटी ड्राइव्हसाठी
ही रोबोटॅक्सी स्टीयरिंग व्हील आणि पेडल्सशिवाय येणार आहे. तसेच चार प्रवासी बसण्याची सुविधा यात आहे. ही कार ताशी 55 किमीपर्यंत वेगाने धावणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. झुक्सने 2020 च्या उत्तरार्धात रोबोटॅक्सिला सादर केले होते.
झुक्सने सदरची कार शहरातील रस्त्यांसाठी डिझाइन केली आहे, परंतु ती महामार्गावरदेखील चांगली कामगिरी पार पाडू शकणार आहे. 2020 मध्ये अॅमेझॉनने झुक्स कंपनी विकत घेतली होती.