ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मराठवाडय़ाने गद्दारांना कधीही साथ दिली नाही, हा इतिहास आहे. संतोष बांगर हे गद्दार आहेत. त्यांनी जुना काळ आठवून बोलावे. जुना काळ न आठवता ते बोलत असतील तर ते नमक हराम आहेत. असे गद्दार मराठवाडय़ात गाडले जातील, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांची आज हिंगोली येथील रामलीला मैदानावर सभा झाली. यावेळी दानवे बोलत होते. ते म्हणाले, संतोष बांगर हे गद्दार आहेत. त्यांनी जुना काळ आठवावा ते काय धंदे करायचे, ते का तडीपार होते? त्यांना कोणी वाचवले. त्यांनी मागचा इतिहास आठवून बोलले पाहिजे. ज्यांनी गद्दारी केली. त्या लोकांना जनता धडा शिकवला जाईल. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. या भूमीत गद्दारांना थारा नसतो.
दरम्यान, राज्यात रावनरूपी सरकार असून, त्यांची वेगवेगळ्या दिशेला दहा तोंडे आहेत. त्यांची वेगळी रूपे आहेत. या रावणाचे दहन उद्धव ठाकरे आपल्या विचाराने करतील, असेही दानवे म्हणाले.