आंबोली -बेळगाव- सावंतवाडी सध्या या मार्गावर डांबरीकरण करण्यात येत आहे. खरंतर पंधरा मे नंतर खडीकरण डांबरीकरण आदी कामे केली जात नाहीत. मात्र यंदा पाऊस लांबणीवर गेल्याने जिल्ह्यात रस्त्यांची कामे जोरात सुरू आहेत. महाराष्ट्र -गोवा -कर्नाटक असा जोडणारा सावंतवाडी -आंबोली -बेळगाव -कोल्हापूर घाटमार्ग गेली कित्येक वर्ष खड्डेमयच होता. मात्र काही भाग डांबरीकरण करून दुरुस्त करण्यात आला होता. मात्र आता माडखोल ते धवडकी दाणोली भागात सध्या जोरात डांबरीकरण सुरू आहे. हे डांबरीकरण चे काम करताना या मार्गावर फक्त खडीची धूळ आणि किरकोळ डांबर टाकण्यात येत असल्यामुळे या मार्गावरून येजा करणारी वाहने या मार्गावरून जाताना धुळीचे कण प्रवासांच्या नाकात तोंडात जात आहे. फक्त मलमपट्टी करण्याचे काम सुरू आहे. या मार्गावर डांबरीकरण आणि त्यावर फक्त खडीचा पावडर फवारा टाकण्यात येत असल्यामुळे मोटरसायकल व छोटी वाहने येजा करताना अपघाताला हे डांबरीकरण निमंत्रण ठरणार तर नाही ना ? त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या मार्गावरून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण विशेष करून येजा करत असतात . तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचाही कोल्हापूर बेळगाव हा येण्या जाण्याचा हा मार्ग आहे . त्यामुळे त्यांनीही या रस्त्याकडे आणि सध्या सुरू असलेल्या या खडीकरण डांबरीकरण कामाच्या बाबत संबंधित विभागाला जागे करणे गरजेचे आहे. नाहीतर पावसाळ्यात येरे माझ्या मागल्या नको अशी मागणी वाहनधारक व प्रवाशातून होत आहे.
Previous Articleदुर्गराज रायगडवरील गाईडना मिळणार आरोग्य विम्याचे संरक्षण
अनुजा कुडतरकर
Anuja Kudtarkar | journalist # content writer # scriptwriter and content producer at tarun bharat news sindhudurg
Related Posts
Add A Comment