कॉकपिटसमोरून गेले चीनचे जे-16
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
चीनच्या लढाऊ विमानाने दक्षिण चीन समुद्रावर आंतरराष्ट्रीय हवाईक्षेत्रात उ•ाण करत असलेल्या अमेरिकेच्या हेरविमानाला रोखले आहे. अमेरिकेने याची माहिती मंगळवारी दिली आहे. चीनच्या जे-16 विमानाने 26 मे रोजी अमेरिकेच्या विमानाच्या कॉकपिटसमोरून उ•ाण केले, यामुळे युएस आरसी-135 हेरविमानात टर्ब्युलेन्स आल्याचे सैन्य कमांडरने सांगितले आहे.
याप्रकरणी चीनकडून अद्याप कुठलीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. अमेरिका अनेकदा चीनवर नजर ठेवण्यासाठी स्वत:ची विमाने अन् नौका तैनात करते, हा प्रकार चीनच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. अमेरिकेने अशाप्रकारची कृत्ये रोखून चीनवर दोषारोप करणे थांबवावे असे अमेरिकेतील चिनी दूतावासाचे प्रवक्ते लियू पेंग्यू यांनी म्हटले आहे.
चीन स्वत:च्या रक्षणासाठी आवश्यक पावले उचलत राहणार आहे. क्षेत्रातील अन्य देशांसोबत मिळून दक्षिण चीन समुद्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काम करू असे पेंग्यू यांनी नमूद केले आहे.
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार आम्ही मुक्त क्षेत्रात उ•ाण करू, तेथे आम्ही सुरक्षित आणि पूर्ण जबाबदारीने उ•ाण करू आणि स्वत:च्या बाजूने संचालन जारी ठेवू असे पेंटागॉनने म्हटले आहे. तर अमेरिकेच्या वायुदलाकडून या घटनेचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला आहे.
चर्चेस टाळाटाळ
चीन सरकारने अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी दिलेले भेटीचे निमंत्रण नाकारल्याचे पेंटागॉनने सोमवारीच स्पष्ट केले होते. अमेरिकेने चीनचे संरक्षणमंत्री ली शांगफू यांना चालू आठवड्यात सिंगापूरमध्ये भेटीसाठी बोलाविले होते. फेब्रुवारी महिन्यात हेरगिरीयुक्त फुग्यांवरून झालेल्या वादापासून चीन अमेरिकेसोबतची चर्चा टाळत आहे. अमेरिकेचे कॉल, बैठका अन् संवादाच्या विनंतीला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यास चीन टाळाटाळ करत आहे.