वृत्तसंस्था/ ताश्कंद
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत येथे सुरू असलेल्या लढतीत अमेरिकेने शुक्रवारी उझ्बेकवर 2-0 अशी आघाडी मिळवली आहे. या लढतीमध्ये अमेरिकेच्या मॅकेन्झी मॅकडोनाल्ड आणि टॉमी पॉल यांनी आपले एकेरीचे सामने जिंकले आहेत.
या लढतीतील झालेल्या पहिल्या एकेरी सामन्यात मॅकडोनाल्डने उझ्बेकच्या सर्जि फोमिनचा 6-4, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये तासभराच्या कालावधीत पराभव करत आपल्या संघाला आघाडीवर नेले. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात टॉमी पॉलने उझ्बेकच्या सुल्तानोव्हवर 6-1, 7-6(8-6) अशी मात केली. या लढतीत आता अमेरिकेने उझ्बेकवर 2-0 अशी भक्कम आघाडी मिळवली आहे. शनिवारी या लढतीतील दुहेरीचा सामना खेळवला जाणार असून रविवारी परतीचे सामने दोन एकेरी सामने होतील.