18 वर्षीय मुलगी कधीकाळी रेस्टॉरंटमध्ये भांडी विसळण्याचे काम करायचे. आता याच रेस्टॉरंटची ही मुलगी मालकीण आहे. पॉट वॉशर, कुक इत्यादींचे काम केल्यावर ती आता युवा उद्योजक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करत आहे. तिचा रेस्टॉरंटचा बिझनेस आता उत्तमप्रकारे सुरू आहे. एका मुलाखतीत तिने स्वत:च्या यशाची कहाणी व्यक्त केली आहे. तसेच बचत आणि गुंतवणुकीबद्दल सांगितले आहे.
अमेरिकेच्या ओहायो येथे राहणारी सामंथा फ्रायने वयाच्या 16 व्या वर्षी हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले. मग कॉलेजमध्ये जाण्याचा निर्णय घेत इंजिनियरिंगमध्ये प्रवेश घेतला. यादरम्यान ती स्वत:चा कॉलेज फंड आणि पॉकेट मनीच्या पैशांना बचत म्हणून जमा करत होती. याचदरम्यान तिला सुटीच्या काळात एका रेस्टॉरंटमध्ये पॉट वॉशरचे काम मिळाले. काही दिवसांनी सामंथा कुक झाली. कॉलेज फंड आणि रेस्टॉरंटमध्ये मिळणाऱ्या पगाराला तिने कुठेतरी गुंतविण्याचा निर्णय घेतला. रेस्टॉरंट मालक स्वत:चे शॉप विकू इच्छितात असे तिला कळले. सामंथाला रेस्टॉरंट खरेदी करून त्यात गुंतवणूक करण्यची योजना अत्यंत योग्य वाटली.
त्यावेळी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. परंतु काही दिवसांपासून पॉकेट मनी आणि कॉलेज फंडसाठी पैसे जमवत होते. तसेच वयाच्या 16 व्या वर्षापासून रेस्टॉरंटमध्ये पार्ट टाइम जॉब करत होते. यातून जमलेल्या पैशांतून रेस्टॉरंट खरेदी करण्यासाठी मालकाला एप्रिलमध्ये डाउन पेमेंट केल्याचे सामंथा सांगते.
सामंथा आता रेस्टॉरंटची मालकीण झाली आहे. ती सध्या केवळ 18 वर्षांची आहे. हे माझ्यासाठी सर्वकाही नवे आहे. आठवड्यातील 5 दिवस मी रेस्टॉरंटमध्ये थांबते आणि उर्वरित दोन दिवस कॉलेजसाठी वेळ देते. रेस्टॉरंटद्वारे मला बऱ्यापैकी उत्पन्न मिळतेय असे तिने सांगितले आहे. सामंथाच्या या धाडसाचे लोकांकडून कौतुक केले जात आहे. तसेच तिला युवा पिढीसाठी प्रेरणा ठरविण्यात येत आहे.