5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत : दोघा संशयितांना अटक
प्रतिनिधी/रत्नागिरी
शहरातील आठवडा बाजार येथे मोबाईल शॉपी फोडण्याचा प्रयत्न चाणाक्ष रिक्षाचालकामुळे फसल़ा. घटनेची खबर रिक्षाचालकाकडून पोलिसांना मिळताच चोरी करून पळण्याच्या तयारी असलेल्या दोघा चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्य़ा. शुकवारी रात्री 1 च्या सुमारास ही घटना घडल़ी दोन्ही संशयितांकडून सुमारे 5 लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल़ा.
नुरमहम्मद दिलमहम्मद खान (22, ऱा मच्छीमार्केट रत्नागिरी) व आलम वागळे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुकवारी रात्री 1 च्या सुमारास शहरातील आठवडा बाजार येथील एस़ एस़ कम्युनिकेशन मोबाईल शॉपीजवळ दोघेजण संशयास्पद हालचाली करत होत़े. या बाबत स्थानिक रिक्षाचालकाकडून ही माहिती शहर पोलिसांना देण्यात आल़ी. त्यानुसार शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाल़े. यावेळी दोघे संशयित हे एस़ एस़ कम्युनिकेशन मोबाईल शॉपीचे शटर उचकटून आतील मुद्देमाल चोरून नेण्याचा प्रयत्न करत होत़े. यावेळी पोलिसांनीदोघा संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून 4 हजार 500 रूपयांची रोख रक्कम व 89 हजार रूपयांचा आयफोन व 4 लाख 7 हजार रूपयांचे इतर मोबाईल व एक्सेसरीज असा मिळून 5 लाख 2 हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल़ा.
तसेच चोरट्यांकडून चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्यही पोलिसांना आढळून आल़े मोबाईल शॉपीमधील चोरीप्रकरणी एस़ एस़ कम्युनिकेशनचे अमोल डोंगरे (40) यांनी रत्नागिरी शहर पोलिसांत तक्रार दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी दोन्ही संशयितांविरूद्ध भादंवि कलम 457, 380 सह 34 नुसार गुन्हा दाखल केल़ा. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज भोसले करत आहेत़