सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन
पणजी : राज्यात आज अनंत चतुर्दशी उत्सव थाटात साजरा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सवांतील गणेशमूर्तींचेही थाटात विसर्जन रात्री उशिरापर्यंत होईल. गोव्यात अवघ्याच काही ठिकाणी अनंत चतुर्दशीनिमित्त अनंत देवाची पूजा केली जाते. हे व्रत फार कडक असते आणि सर्वात मोठी पूजा ही अनंताची पूजा असे मानले जाते. आज गोव्यातील अवघ्याच काही घरांमध्ये अनंताचे व्रत केले जाणार आहे. महाराष्ट्रातील परंपरेप्रमाणेच गोव्यातही आजच दहा दिवसीय सार्वजनिक गणेशोत्सवचे विसर्जन होणार आहे. यानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जय्यत तयारी केलेली आहे. सायंकाळी विसर्जन झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मिरवणूक निघतील.गेल्या वषी प्रमाणे यंदाही या मिरवणुकांवर पावसाचे सावट पसरलेले आहे. हवामान खात्याने आज मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.