माडखोल उत्कर्ष ग्रुपचे सलग तिसऱ्या वर्षी आयोजन
ओटवणे प्रतिनिधी
माडखोल येथील उत्कर्ष ग्रुपच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या गणेश मूर्ती व सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक अनंतराव देसाई (बेबीवाडी), द्वितीय क्रमांक (विभागून) विश्राम आडेलकर (डुंगेवाडी) आणि गोविंद दळवी (टेंबवाडी), तृतीय क्रमांक महादेव धोंड (धुरीवाडी) यांनी पटकाविला. तर उत्तेजनार्थ पारितोषिकसाठी मधुकर वसंत राऊळ (बेबीवाडी) आणि तेजस लाड (धुरीवाडी) यांची निवड करण्यात आली.
माडखोल ग्रामदैवत पावणाई मंदीरात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी देवस्थान प्रमुख मानकरी दत्ताराम राऊळ, सरपंच सृश्णवी सुयोग राऊळ, उपसरपंच जिजी राऊळ माजी सरपंच राजन राऊळ, बाळू शिरसाट, माजी तंटामुक्ती अध्यक्ष जगन्नाथ परब, पोलीस पाटील उदय राउत, माजी पोलीस पाटील लक्ष्मण बरागडे, सोसायटी संचालक आनंद राऊळ, प्रकाश नाईक, माजी सैनिक जगन्नाथ परब, स्पर्धेचे परीक्षक अरविंद नारायण सरनोबत, दीपक पंडित आदी उपस्थित होते.
स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकासह उत्तेजनार्थ स्पर्धकांना मान्यवरांच्याहस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनाही सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उत्कर्ष गॄपच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त तथा धवडकी शाळा नंबर २ चे शिक्षक अरविंद सरनोबत आणि माडखोल शाळा नंबर १ चे शिक्षक दीपक पंडित यांचा शाल श्रीफळ आणि सुपारीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५१११ रूपये (माजी सरपंच राजन राऊळ आणि शृश्रवी राऊळ ), द्वितीय पारितोषिक ३१११ रूपये (प्रमोद राऊळ ), तृतीय पारितोषिक-२१११ रूपये ( फोटोग्राफर प्रभाकर गावडे ), उत्तेजनार्थ पारितोषिक ११११ रूपये ( सचिन मोरजकर ) यांनी पुरस्कृत केली होती.
उत्कर्ष ग्रुपच्यावतीने तिसऱ्यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्वांनीच या उपक्रमाचे कौतुक करून पुढील वर्षीही या स्पर्धेला व्यापक स्वरूप देण्याचा मनोदय व्यक्त केला. या स्पर्धेनिमित्त सर्वांनाच एकापेक्षा एक असे सरस देखावे आणि आकर्षक गणेश मुर्त्या पहावयास मिळाल्या.या स्पर्धेचे नियोजन उत्कर्ष ग्रुपचे सुयोग राऊळ, मेघनाथ पालव, बाळू शिरसाट, मयुरेश राऊळ, जीवन केसरकर आदींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड सुरेश आडेलकर तर सुत्रसंचालन लखन आडेलकर आभार प्रमोद राऊळ यांनी मानले