वृत्तसंस्था/ बिजिंग
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या झुहेई चॅम्पियनशिप पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत ब्रिटनच्या माजी टॉप सिडेड अँडी मरेने एकेरीत विजयी सलामी देताना चीनच्या काँगचा पराभव केला.
पहिल्या फेरीतील सामन्यात ब्रिटनचा 36 वर्षीय मरेने काँगचा 7-5, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. हा सामना 100 मिनिटे चालला होता. मरेचा पुढील फेरीतील सामना कॅरेटसेव्हशी होणार आहे. कॅरेटसेवने पहिल्या फेरीतील सामन्यात मॅटो अरनाल्डीवर 6-7 (5-7), 7-6(7-5), 6-2 अशी मात केली. हा सामना साडेतीन तास चालला होता. अन्य एका सामन्यात मॅकेन्झी मॅकडोनाल्डने चीनच्या जूनचेंगचा 6-4, 6-7(3-7), 6-3 असा पराभव केला. हा सामना अडीच तास चालला होता. पाचव्या मानांकित टॉमस इचेव्हेरीने ऑस्ट्रेलियाच्या सेव्हेलीवर 6-4, 6-4 अशी मात करत विजयी सलामी दिली.