बेंगळूर
दुष्काळग्रस्त तालुके जाहीर करण्याबाबत सोमवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार असून केंद्र सरकारच्या निकषानुसार दुष्काळी तालुके जाहीर केले जातील, अशी माहिती महसूलमंत्री कृष्णभैरेगौडा यांनी दिली. रविवारी बेंगळुरात पत्रकारांशी ते बोलत होते. 18 ऑगस्ट रोजी सुमारे 113 तालुक्मयांची तात्पुरती दुष्काळग्रस्त म्हणून यादी केली आहे. 31 ऑगस्ट रोजी सुमारे 75 तालुक्मयांची यादी तयार केली आहे. कोणते तालुके पात्र ठरतील याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेतला जाईल. गरज पडल्यास त्याकडे मंत्रिमंडळाच्या निदर्शनासही आणून दिले जाईल. प्रत्येक तालुक्यातील पीक सर्वेक्षणाच्या आधारे सोमवारी दुष्काळग्रस्त तालुक्मयांची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. तर दुसरी यादी पुढील आठवड्यात किंवा दहा दिवसांमध्ये जाहीर केली जाईल असेही ते म्हणाले.