बेळगाव ः एस. जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेला मोठय़ा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. महाविद्यालयाच्या मैदानावर प्रमुख पाहुणे म्हणून अमरनाथ डुकरवाडकर, डॉ. अल्लमप्रभू महास्वामीजी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. आर. पटगुंदी, क्रीडा प्राध्यापक विजय अरळीमट्टी आदी मान्यवर व्यासपीठावर होते. प्रारंभी पुजेने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. विविध गटाच्या खेळाडूंनी पथसंचलन करुन पाहुण्यांना मानवंदना दिली. पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. प्रा. आनंद बनकड यांनी उपस्थितांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. प्रणाली जाधव व तिच्या सहकाऱयांनी क्रीडाज्योत फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. प्रणाली जाधव व ऋतुराज के. यांनी खेळाडूंना शपथ देवविली. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
यावेळी अमरनाथ डुकरवाडकर यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले. स्वामीजीनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.