ऑनलाईन टीम/तरुण भारत
आय.एन.एस. विक्रांत (ins vikrant) युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून अपहार केल्याच्या आरोप शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला होता. आता प्रकरणी किरीट सोमय्यांची (kirit somaiya) आर्थिक गुन्हे शाखेकडून (anti corruption bureau) चौकशी केली जात आहे. सोमवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावली. आज पुन्हा चौकशीसाठी किरीट सोमय्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
सोमवारी सोमय्यांचा तीन तासांच्या चौकशीअंती जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. चौकशीनंतर बाहेर पडताच, सोमय्या यांनी, मी तपासाला पूर्ण सहकार्य केले आहे. तसेच माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. सत्याचाच विजय होईल, असे सांगितले होते. आज पुन्हा सोमय्यांची आर्थिक गुन्हे शाखेसमोर चौकशी होणार आहे. चौकशीसाठी सोमय्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाले आहेत.
आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली किरीट सोमय्या व त्यांचा मुलगा नील यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. माजी सैनिक बबन भोसले यांनी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुह्यांतील रक्कम १० कोटींपेक्षा जास्त असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी दोघांनाही समन्स बजावत चौकशीला बोलावले होते.