अनुष्का शर्मा दीर्घकाळापासून मोठ्या पडद्यावरून गायब आहे. यापूर्वी ती ‘झीरो’ चित्रपटात शाहरुख खानसोबत 2018 मध्ये दिसून आली होती. त्यानंतर 2022 मध्ये ‘कला’ चित्रपटात तिने छोटी भूमिका केली होती. आता चार वर्षांनी अनुष्का ही माजी क्रिकेटपटू झूलन गोस्वामीचा बायोपिक ‘चकदा एक्स्प्रेस’सोबत मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. हा चित्रपट चालू वर्षाच्या अखेरीस नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याचदरम्यान अनुष्काने केलेल्या एका घोषणेमुळे तिचे चाहते काही प्रमाणात निराश झाले आहेत.
वर्षात केवळ एकच चित्रपट करणार असल्याचे अनुष्काने म्हटले आहे. सध्या माझे लक्ष कुटुंबावर विशेषकरून मुलगी वामिकावर केंद्रीत करू इच्छिते. वामिकाचे वय पाहता तिला माझी अत्यंत गरज आहे. विराट एक चांगला पिता आहे, परंतु वामिकाला या वयात त्याच्यापेक्षा माझी अधिक गरज आहे असे अनुष्काने म्हटले आहे.
अभिनय करण्यात मला मजा येतश, परंतु पूर्वीप्रमाणे मी अनेक चित्रपट करू शकत नाही. वर्षात केवळ एकच चित्रपट करू इच्छिते. अभिनय अन् आयुष्यादरम्यान संतुलन राखू इच्छिते. ज्याप्रकारचे जीवन मी जगतेय त्यातून मला आनंद मिळतो असे तिने म्हटले आहे.