नवी दिल्ली
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोच्या सीएफओपदी (चीफ फायनान्शियल ऑफिसर) अपर्णा अय्यर यांची निवड करण्यात आल्याची घोषणा कंपनीने गुरुवारी उशीरा केली आहे. याआधी या पदावर जतीन प्रवीणचंद्र दलाल कार्यरत होते, ज्यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त होते. नव्याने नियुक्त झालेल्या अपर्णा अय्यर या कंपनीचे सीईओ थेलरी डेलापोर्टे यांना आपल्या कामाची माहिती देतील.