प्रतिनिधी/ बेळगाव
मतदारयाद्यांमधील आपली नावे पाहण्यासाठी मतदारांना नवीन अॅप सुरू करण्यात आले आहे. या अॅपद्वारे आपले नाव योग्य आहे की नाही? त्यामध्ये कोणती चूक झाली आहे का? हे देखील आता पाहता येणार आहे. ज्यांना मतदारयादीमधील आपले नाव पहायचे आहे, त्यांनी `www.nvsp.in ceo.karnataka.gov.in’ या अॅपचा आधार घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मतदारयाद्या तयार केल्या आहेत. आठ दिवसांपूर्वी मतदारयाद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. ज्यांच्या नावामध्ये तसेच पत्त्यामध्ये चुका झाल्या आहेत, त्यांनी अर्ज करावेत, असे आवाहनही करण्यात आले होते. त्यानंतर आता नव्याने आणखी एक अॅप सुरू करण्यात आले आहे. याचबरोबर टोल फ्री क्रमांक 180042551950 यावर आपण त्याची माहिती घेऊ शकतो, असे सांगितले आहे.