कोविड संकट काळातील सेवभावी कार्याची दखल
प्रतिनिधी /पणजी
कोविडचे संकट हे भंयकर होते. या काळात अनेकांचे संसार उध्वस्त झाले, या भयंकर रोगामुळे अनेकांना हाकनाक प्राणास मुकावे लागले. सर्वत्र भयावह स्थिती असतानाही डॉक्टर, परिचारिका व आरोग्य खात्यातील कर्मचाऱयांनी दिलेले योगदान हे वाखणण्याजोगे होते. या कार्याची आठवण ठेवून दोनापावला येथील मणिपाल इस्पितळातील डॉक्टर, परिचारिका यांचा गौरव करण्यात आला.
हा कार्यक्रम प्रजापित ब्रह्मा कुमारीज ईश्वरीय विश्व विद्यालय व मणाल इस्पितळ यांच्या संयुक्त विद्यमाने राजयोग एज्युकेशन ऍण्ड रिसर्च फाउंडेशन यांच्यातर्फे घेण्यात आला. या कार्यक्रमाला बी. के. शोभा (गोवा आणि सिंधुदुर्गसाठी ब्रह्माकुमारिंचे प्रशासकीय प्रभारी), डॉ. बनारसीलाल शाह, (कार्यकारी सचिव, वैद्यकीय शाखा, राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन, माउंट अबू, राजस्थान), मणिपाल इस्पितळातील डॉ. शेखर साळकर, डॉ. अमोल महालदार, डॉ. सीताकांत घाणेकर उपस्थित होते. कोविड-19 साथीच्या आजाराविरुद्धच्या लढय़ात वैद्यकीय कर्मचाऱयांनी दिलेल्या सेवांचा गौरव करण्यासाठी एक सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
बीके शोभा (गोवा आणि सिंधुदुर्गसाठी ब्रह्माकुमारिंचे प्रशासकीय प्रभारी), डॉ बनारसीलाल शाह, (कार्यकारी सचिव, वैद्यकीय शाखा, राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फाऊंडेशन, माउंट अबू, राजस्थान येथील ब्रह्माकुमारिस मुख्यालयातील) यांनी कोविड योद्ध्यांचा सत्कार केला. यात डॉ. साळकर, डॉ. महालदार, डॉ. घाणेकर यांच्याबरोबर मणिपाल इस्पितळातील सुमारे 35 वैद्यकीय कर्मचारी, पणजी आणि आसपासच्या इस्पितळातील 15 डॉक्टर आणि परिचारिका यांचा समावेश होता. या सर्वांना गौरवप्रित्यर्थ पदके आणि प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
कोविड 19 महामारीचा सामना करताना त्यांचे सहकारी आणि वैद्यकीय कर्मचाऱयांनी दिलेले बलिदान याविषयीचे अनुभव डॉ. साळकर यांनी सांगितले. सांगितले. डॉ. साळकर यांनी आरोग्य सेवा संचालनालयाने केलेल्या कामाचेही कौतुक केले. ज्यात त्यांचे डॉक्टर विशेषतः आयुष डॉक्टर, परिचारिका, पीएचएन, एनएम, इतर मल्टीटास्किंग कर्मचारी, गोवा वैद्यकीय महाविद्यालय, विविध एनजीओ, लायन्स, रोटरी क्लब, आयएएस अधिकारी यांनीही कोविड काळात उल्लेखनीय कार्य केल्याचे डॉ. साळकर म्हणाले.
डॉ. बनारसीलाल शाह म्हणाले, कोरोना विषाणूमुळे साथीच्या आजाराच्या अभूतपूर्व काळात वीरहार्ट डॉक्टर, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी आणि सफाई कामगारांच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, त्यांच्या स्वतःच्या जीवनात कितीही आव्हाने आली तरी वैद्यकीय समुदाय निस्वार्थपणे त्यांचे कर्तव्य बजावत आहे. ते कोविड विषाणू आणि इतर जीवघेण्या संसर्गाचा सामना करत आहेत, लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचा जीव धोक्मयात घालत आहेत.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील वरि÷ निवासी डॉक्टर डॉ. नेहा खरंगटे यांनी कोविड वॉरियर्सचे त्यांच्या वेळापत्रकातून वेळ काढून कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आभार मानले.
डॉ. नेहा राजयोग यांनी चिंता आणि तणावापासून मुक्ती कशी मिळवता येईल, याचा अनुभव सांगितले. बी. के. नागराज यांनी स्वागत केले.