अटलांटिकमध्ये होणारे बदल याकरता कारणीभूत
नॉर्थ अटलांटिक वॉटरमध्ये होणाऱ्या बदलांमुळे आर्क्टिक ओशनच्या तापमानावर प्रभाव पडतो. वैज्ञानिकांनी या प्रक्रियेला अटलांटिफिकेशन ऑफ आर्क्टिक ओशन नाव दिले आहे. याचमुळे 2007 नंतर पासून आर्क्टिक महासागरातील बर्फ अधिक प्रमाणात वितळला आहे. याचा प्रभाव भारतीय मान्सूनवरही पडला आहे.
अटलांटिफिकेशन ऑफ आर्क्टिक ओशन आर्क्टिक डीपोलमुळे घडले आहे. यामुळे आगामी काळात बर्फ आणखी वितळणार आहे. आक्टिंक डीपोल दबावाचा एक पॅटर्न आहे. यामुळे उत्तर अमेरिकेच्या आर्क्टिक क्षेत्रांवर उच्च दबाव आणि यूरेशियाच्या आर्क्टिक क्षेत्रांवर कमी दबाव निर्माण होतो असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
आर्क्टिक डीपोलमुळे दक्षिणेकडून येणारे वारे वेगाने आर्क्टिक महासागरात पोहोचतात आणि याचमुळे तेथील बर्फ वेगाने वितळतो. 2007 मध्ये हेच घडले होते. तेव्हा 4.13 दशलक्ष चौरस किलोमीटर इतका बर्फ वितळला होता. एका अहवालानुसार दर 10 वर्षांमध्ये आर्क्टिकचा 12.6 टक्के बर्फ विळतोय.
बर्फाच्या तुलनेत समुद्राचे पाणी अधिक गडद रंगाचे असल्याने ते अधिक उष्णता शोषून घेते. यामुळे अधिक बर्फ वितळतो आणि पाणी वाढल्याने अधिक उष्णता शोषून घेतली जाते, यामुळे पुन्हा अधिक प्रमाणात बर्फ वितळतो. हे दुष्टचक्र वाढतच जाते. याचमुळे उर्वरित भागाच्या तुलनेत आर्क्टिक दशकांपासून दुप्पट वेगाने उष्ण होत आहे.
आर्क्टिकमध्ये जमीन नेहमीच बर्फाच्छादित असते, याला परमाफ्रॉस्ट म्हटले जाते. यात अनेक ऑर्गेनिक पदार्थ फसलेले असतात, ज्यात जगातील कार्बनचा निम्मा हिस्सा गोठलेला आहे. हा हिस्सा वितळल्याने कार्बन डाय ऑक्साइड वायू मुक्त होतो, यामुळे हिमवृष्टीचा कालावधी घटत असून वणवे लागण्याचा कालावधी वाढत आहे. बर्फ वितळल्यावर आग किंवा सडल्यामुळे हा कार्बन डायऑक्साइड आणि मिथेनच्या स्वरुपात बाहेर येऊ शकतो, यामुळे थेट स्वरुपात जागतिक तापमान वाढणार आहे. आर्क्टिकचा बर्फ वितळल्याने ट्रॉपिक्सकडून उत्तरेच्या दिशेने वाहणाऱ्या पाण्यातील खारेपणा कमी होईल, यामुळे त्याचे घनत्व कमी होणार आहे अणि हे परतीच्या प्रवासासाठी समुद्राच्या खोलवर पोहोचणार नाही. सागरी प्रवाहाचा वेग कमी झाल्याचा प्रभाव भारतीय मान्सूनपासून प्रशांत महासागरात अल-नीनोच्या पॅटर्नवर पडत आहे. सर्वाधिक भीती ग्रीनलँडमध्ये गोठलेल्या बर्फाला नुकसान पोहोचण्याची आहे.
भारतात आपत्ती वाढणार
भारतीय उपखंड म्हणजेच बांगलादेश, नेपाळ, दक्षिण चीन आणि भारत तसेच अफगाणिस्तानपर्यंतचे पूर्ण क्षेत्र सातत्याने वादळी पाऊस, पूर आणि ढगफुटी यासारख्या आपत्तींना सामोरा जात आहे. आगामी काळात या घटना आणखी वाढणार आहेत. भारतात आर्द्रतेचे स्रोत दक्षिण अन् पश्चिमेचे क्षेत्र राहिले आहे. परंतु काही वर्षांपासून आर्क्टिककडूनही आर्द्रता भारतात पोहोचत आहे. हवामान बदलाचा सर्वाधिक प्रभाव आर्क्टिकच्या ग्लेशियर्सवर दिसून येत आहे. जागतिक तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअस असताना आर्क्टिकमध्ये तापमानवाढ 4 अंश इतकी नोंदली गेली आहे. बर्फ वेगाने वितळत असल्याने थंड वारे वेगाने हिमालयाच्या उत्तर अन् दक्षिण दिशेला वाहत आहेत. हे थंड वारे सखल भागातील उष्ण वाऱ्यांना धडकल्यावर वादळाची निर्मिती होते. यामुळे भारतात वादळी पाऊस आणि पूराची भीती वाढू लागते.