खानापूर प्रतिनिधी – खानापूर येथील श्री रवळनाथ मंदिरात दि. 17 पासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होत आहे. दि. 23 पर्यंत हा सोहळा संपन्न होणार आहे. दरम्यान रोज प्रवचन, कीर्तन व सांप्रदायिक भजन असे विविध कार्यक्रम होत आहेत. प्रवचन व कीर्तनाला भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.
गुरुवार दि. 22 रोजी दुपारी दोन वाजल्यापासून दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. या दिंडी प्रदक्षणेमध्ये खानापूर शहरातील प्रमुख बाजारपेठ, त्यानंतर चिरमुरकर गल्ली, स्टेशन रोड, शिवस्मारक, खानापूर-बेळगाव रस्ता, बसवेश्वर चौक त्यानंतर मलप्रभा क्रीडांगणावर सायंकाळी 4 वाजता रिंगण सोहळा होणार आहे. अंकली येथील शितोळे सरकारांच्या आश्वांचा रिंगण होणार आहे. हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी खानापूर शहरासह तालुक्यातील भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजन कमिटीतर्फे आवाहन करण्यात आले आहे. अश्वांचा रिंगण सोहळा पार पडल्यानंतर पुन्हा दिंडी बसवेश्वर सर्कल पासून श्री चौराशी मंदिर, बाजार पेठ मार्गे रवळनाथ मंदिराकडे येऊन दिंडी ची सांगता होणार आहे.
Related Posts
Add A Comment