बिबट्याला पकडण्याची शोध मोहीम तीव्र झाली असून रात्री 2:30 वाजता शिमगा येथून प्रशिक्षित हत्ती (टस्कर) दाखल झाले आहेत. बुधवारी पहाटेपासूनच वनखाते आणि पोलीस खाते यांनी रेस कोर्स परिसरात बंदोबस्त वाढवला असून रस्ते अडविले आहेत, शिवाय बिबट्याला पकडण्यासाठीची उपाययोजना तीव्र केली आहे. शिमोगा येथील डॉ. विनय यांच्या नेतृत्वाखाली हत्तीचे पथक बेळगावमध्ये दाखल झाले असून ‘अर्जुन’ आणि ‘आले’ नावाचे हे दोन प्रशिक्षित हत्ती रेस कोर्स मैदानावर दाखल झाले आहेत. याखेरीज बिबट्याला शोधण्यासाठी हायटेक ड्रोन कॅमेराचाही वापर होणार आहे. बुधवारी पहाटेपासून पोलीस आणि वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्यासाठी संयुक्तरित्या मोहीम सुरू केली आहे.
Previous Articleआरटीई अंतर्गत शाळेचे थकीत वेतन त्वरीत मंजुर करावे
Next Article ऑडी पुढील महिन्यात किमती 2 टक्क्यांनी वाढवणार