यूजि चषक 35 वर्षावरील क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित 35 वर्षांवरील वरिष्ठांया 35 प्लस युनियन जिमखाना प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सोमवारी युनिव्हर्सल स्पोर्ट्सने आरएम ाााwगुले बीसीसी संघा 8 धावानी तर अर्जुन स्पोर्ट्स संघाने साई स्पोर्ट्सा 13 धावांनी पराभव कान प्रत्येकी 2 गुण मिळविले. सामनावीर दादापीर हाजी, विनायक सिद्धलिंग यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना युनिव्हर्सल संघाने 18.3 षटकात सर्व बाद 120 धावा केल्या. त्यात दादापीर हाजीने 46, सागर गौरगोंडाने 22 धावा केल्या. आरएम चौगुले बीसीसीतर्फे जोतिबा गिलबिले व मनोज पाटील यांनी प्रत्येकी 3 व प्रवीण कराडेने 2 गडी बाद केले. प्रत्त्युतरादाखल खेळताना आरएम चौगुले संघ 112 धावा जमवू शकला. त्यात जोतिबा गिलबिलेने 26, दत्तप्रसाद जांभवलेकरने 20 धावा केल्या. युनिव्हर्सलतर्फे वसीम धामणेकर, अनंत माळवी व सुनील पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रमुख पाहुणे राहुल नाईक तेजस पवार व अमरदीप पाटील यांच्या हस्ते सामनावीर दादापीर हाजी व इम्पॅक्ट खेळाडू जोतिबा गिलबिले यांना सन्मानित करण्यात आले.
दुसऱया सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स संघाने 20 षटकात 8 गडी बाद 130 धावा केल्या. त्यात प्रसाद नाकाडीने 33, आरिफ बाळेकुंद्री व विनायक सिद्धलिंग प्रत्येकी 18 धावा केल्या. साई स्पोर्ट्सतर्फे सचिन साळुंखे, ताहीर सराफ, हनीफ शाबास खान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्त्युतरादाखल खेळताना साई स्पोर्ट्स संघाचा डाव 19.4 षटकात 117 धावात आटोपला. त्यात नरेंद्र मांगोरने 32, शाबास खान व शंकर होसमणी प्रत्येकी 20 धावा केल्या. अर्जुन स्पोर्ट्सतर्फे नंदकुमार मलतवाडकर व विनायक सिद्धलिंग प्रत्येकी 3 तर भरत गाडेकरने 2 गडी बाद केले. प्रमुख पाहुणे अनिल गवी, शहजाद पठाण यांच्या हस्ते सामनावीर विनायक सिद्धलिंग व इम्पॅक्ट खेळाडू प्रसाद नाकाडी यांना गौरविण्यात आले.