न्हावेली / वार्ताहर
आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून उज्वला उमेश रेडकर ९३.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला . व्दितीय क्रमांक चिन्मयी बाळकृष्ण गोवेकर ८७ टक्के तर प्रतिक्षा राजाराम कुबल ८६ . ८० टक्के गुण मिळवून तृतीय आली . यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष रोहिदास सावंत , उपाध्यक्ष नीलेश परब , सेक्रेटरी राजन नाईक मुख्याध्यापक विद्याधर देसाई शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .