विविध हिंदु संघटनांची वाळपई पोलिसांकडे मागणी
वाळपई : प्रभू श्रीरामचंद्रांसंदर्भात नाझिम अस्लम याने समाज माध्यमांवर शिविगाळ करणारे विधान केल्यामुळे त्याला शोधून काढून अटक करावी, अशी मागणी सत्तरी तालुक्यातील हिंदू संघटनांनी केली आहे. वाळपई पोलिसस्थानकावर हिंदू संघटनांनी निवेदन सादर करून ही मागणी केली आहे. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व इतर संघटनांतर्फे निवेदन सादर करण्यात आले आहे. त्यांनी उपनिरीक्षक विभाग पवार यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करुन अस्लमच्या अटकेचा आग्रह धरला. दोन दिवसांपूर्वी मुस्लिम धर्मासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल मासोर्डे सत्तरी येथील किशन नाईक या तऊणाला ताबडतोब अटक करण्यात आली होती. त्याच पद्धतीने आता वाळपई पोलिसांनी अस्लम या इसमावरही अटकेची करावाई करावी, अशी मागणी केली. यावेळी सह्याचे निवेदन पोलीस अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना तुळशीदास काणेकर, देमू गावकर, गौरेश गावस यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. हिंदू धर्मातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.