हजारो पर्यटकांनी केले गोवा दर्शन
वास्को : मुरगाव बंदरात आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या व्रुझ जहाजांची संख्या आता वाढू लागली आहे. रविवारी एकाच दिवशी दोन जहाजांचे आगमन झाल्याने आणखी भर पडली. व्रुझवरील कर्मचाऱ्यांसह हजारो पर्यटक या जहाजांमधून आले आहेत. या जहाजांचे व पर्यटकांचे एमपीएचे अध्यक्ष डॉ. एन. विनोदकुमार, उपाध्यक्ष जी. पी. राय तसेच इतर अधिकारी व पर्यटन खात्याने स्वागत केले. ‘एम. व्ही. कॉस्ता सॅरेना’ आणि ‘एम. व्ही. रेझेलीन लेडी’ या दोन जहाजांचे मुरगाव बंदरात आगमन झाले आहे. जहाजांतील पर्यटकांनी गोव्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचा दौरा केला. एम. व्ही. रेझेलीन लेडी हे जहाज मुरगाव बंदरातून श्रीलंकेच्या प्रवासाकडे रवाना झाले.