ऑनलाईन टीम/तरुण भारत
आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Chief Minister of Delhi) हे राष्ट्रीय राजधानीत भाजपशासित महापालिकांनी सुरू केलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेला तोंड देण्यासाठी रणनीती तयार करण्यासाठी पक्षाच्या आमदारांसोबत (MLA Meet) महत्त्वपूर्ण बैठक घेणार होते. पण दिल्लीतील मुंडका (delhi mundka fire) येथे लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक रद्द करण्यात आली आहे. दरम्यान या भीषण आगीत २७ लोकांचा मृत्यू झाला आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
तसेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia Deputy Chief Minister of Delh) यांच्या हस्ते इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग पॉइंट्सच्या उद्घाटनासह इतर अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, त्यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाला सांगितले.
अरविंद केजरीवाल राष्ट्रीय राजधानीत भाजपशासित महापालिकांनी सुरू केलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेला तोंड देण्यासाठी रणनीती तयार करण्यासाठी पक्षाच्या आमदारांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेणार होते. दिल्लीतील सिव्हिल लाइन्स येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळी ११ वाजता ही बैठक सुरू होणार होती.
शुक्रवारी चार मजली इमारतीला लागलेली आग पहिल्या मजल्यावरून सुरू झाली ज्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, राउटर आणि असेंबल तयार करणाऱ्या कंपनीचे कार्यालय आहे, असे पोलिसांनी सांगितले.